अखेर जिवंतपणी नरक यातना भोगणाऱ्या उजळाईवाडीतील अक्काताई खाडेची सुटका: वृद्धाश्रमांने दिले मायेची सावली..

Share News

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) : भारतीय समाज सेवा देवांश मनुष्य समाज सेवा निराधारांचा आधार, मतिवडे कोगनोळी (ता. निपाणी) येथील या सेवाभावी संस्थेने उजळाईवाडीतील कोर्ट कॉलनी येथील अक्काताई श्रीपती खाडे (व.व ८०) या निराधार वृद्धाची अखेर नरक यातनेतून सुटका करीत आपल्या वृद्धाश्रम मध्ये मायेची सावली दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,उजळाईवाडी येथील कोर्ट कॉलनी मध्ये अक्काताई श्रीपती खाडे या वृद्धेला एकाकी सोडून काही भामट्यांनी तिच्या वर्तणुकीचा गैरफायदा घेऊन तिचे लाखो रुपये लुटले आहेत. ती एकाकी अन्न,वस्त्र निवाऱ्या पासून राहत होती.तिची माहिती देवांश वृद्धाश्रम, मतिवडे कोगनोळी या संस्थेला सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ढाले व मोहन सातपुते यांनी संस्थेचे अमर पोवार,संचालिका शुभांगी पोवार यांना दिली.आणि अखेर त्या वृद्धेला वृद्धाश्रम मध्ये कायमस्वरूपी राहण्याची सोय केली.

याकामी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि रविराज फडणीस, उजळाईवाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे,तंटामुक्ती अध्यक्ष नायकु बागणे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटील,पोलिस कर्मचारी किरण मोरे, पोलिस कर्मचारी श्री. पाटील, करण पाटील,युवा संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते मोहन सातपुते हजर होते.

आजीची अवस्था दयनीय होती. अंधाऱ्या खोलीत मिणमिणत्या डोळ्यांनी अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून त्या वंचित होत्या.सामाजिक जाणिवेतून राजेंद्र ढाले यांच्या मदतीने तिची कायमस्वरूपी राहण्याची मोफत सोय केली आहे – मोहन सातपुते , सामाजिक कार्यकर्ते

सामाजिक बांधिलकीतून देवांश वृद्धाश्रमाध्ये दोन हजाराच्या वर वृद्धांच्या पुनर्वसनाची आज अखेर सोय केली.कोणतीही फी नाही.सर्व सेवा मोफत दिल्या जातात.वृद्धाश्रम मध्ये सुरुवातीपासून मृत्यू पर्यंत काळजी घेतली जाते – अमर पोवार
संस्थापक, देवांश वृद्धाश्रम

मी माझ्या कष्टाची पूंजी बँकेत साठवून ठेवली होती.माझी फसवणूक झाली आहे.पोलिसांनी त्या फसवणूक करणाऱ्यांना अटक करावी.माझे लाखो रुपये परत मिळवून द्यावेत – अक्काताई श्रीपती खाडे
निराधार वृद्धा

जिवंतपणी नरक यातना भोगणाऱ्या उजळाईवाडीतील अक्काताई खाडे यांची अखेर वृद्धाश्रम मध्ये सोय करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!