मिरजेत साईनंदन कॉलनीत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्तीची उत्साहात प्राणप्रतिष्ठापना

मिरज – साईनंदन कॉलनी येथे नव्यानेच बांधलेल्या श्रीराम मंदिरात करवीर पीठ कोल्हापूरचे श्री विद्या नृसिंह सरस्वती शंकराचार्य यांच्या शुभहस्ते श्री प्रभू श्री रामचंद्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे, भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे, नगरसेविका सौ. अनिता वनखंडे, नगरसेवक गणेश माळी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सागर वनखंडे, माजी नगरसेवक महादेव कुरणे, सौ.जयश्री कुरणे,बाबासाहेब आळतेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते,प्रभू श्रीरामाच्या व्यवहार पथावर चालणे आपले कर्तव्य ठरते म्हणून जीवनात सत्यनिष्ठा, क्षमाक्षिलता, नम्रता, अंतकरणाची मृदूता व कर्तव्य पालनात स्वतः विषयीची कठोरता इत्यादी श्रीरामाच्या गुणवैशिष्ट्यांचे आचरण व्यक्तिगत जीवनात व निदान आपल्या कुटुंबीयांच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाला प्रामाणिकपणे करावा लागेल असे मत करवीर पिठाचे श्री विद्या नृसिंह सरस्वती शंकराचार्य यांनी केले. यावेळी ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या लहान बालिकांनी प्रभू श्रीराम, सीता, हनुमान यांच्या पारंपारिक वेशभूषेत रामावर आधारित गीतांवर नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थित लोकांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा लाभ उपस्थितानी घेतला. कार्यक्रमाचे आयोजन स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!