कुपवाड – उमेद साइजर्स या कंपनीस टेक्स्टाईल प्रमोशन कौन्सिल भारत सरकार निर्मित संस्थेमार्फत सन २०२२-२३ चे ग्रे कॉटन फॅब्रिक्स निर्यातीचे सुवर्ण पदक संतोष कुमार सारंगी डायरेक्ट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड आणि श्रीमती रूप राशी टेक्स्टाईल कमिशनर भारत सरकार यांच्या हस्ते पंचतारांकित हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले.
यापूर्वी उमेद साइजर्स यांना महाराष्ट्र शासनाकडून 13 वेळा निर्यातीचे सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते निर्यात श्री पुरस्कारही प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच वेस्टर्न रिजनचे निर्यातीचे पुरस्कारही मिळालेले आहेत. उमेद साइजर्स ही कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील थ्री स्टार एक्सपोर्ट हाऊस नामांकन कंपनी असून सदर कंपनी ही आयएसओ ९००१-२०१५ आहे. सदर कंपनी ऑर्गनिक कॉटनचे कापडाचेही उत्पादन करणारी व क्रिसील रेटेड कंपनी आहे.
यशस्वी गरूडझेप घेत उमेद समुहाने जिल्हयाच्या औद्योगिक जडणघडणीतही यशाचा मानाचा तुरा खोवला आहे. सदर कंपनी ही उमेद ग्रुपचे चेअरमन नेमीचंद मालू व मालू कुटुंबियाच्या मार्गदर्शनाखाली चालविली जाते. सदरच्या पुरस्काराचे श्रेय मालू कुटुंबीयांनी आपला स्टाफ व सर्व कामगारांना कामगारांना अर्पण केले आहे. कर्मचारी यांचे परिश्रम आणि एकोप्यामुळेच सदरचे यश मिळाले आहे असेही आवर्जून सांगितले.कामगारांचे परिश्रम, उत्कृष्ट नियोजनामुळेच कंपनीला यश मिळाले.