कुपवाड – रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याचेच औचित्य साधून कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स आणि एम एस आय ब्लड बँक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत कृष्णा व्हॅली चेंबर मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरी कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक व कामगारांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेवून आपले बहुमूल्य असे योगदान रक्तदानाच्या निमित्ताने देण्यात यावे असे आवाहन केलेले आहे.