कुपवाड – कामगारांच्या आरोग्य तपासणी राज्य कामगार विमा योजनेकडून (ई .एस.आय.) व्हावी याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगारमंत्री सुरेश खाडे यांना निवेदन दिल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली.
यावेळी मालू म्हणाले की, जे उद्योजक फॅक्टरी अॅक्ट मध्ये समावेशीत आहेत त्यांना आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी वर्षातून दोन वेळा करून घेणे नियमाने सक्तीचे केले आहे. हा नियम स्त्युत्यंच आहे. त्यामुळे नाईलाजाने उद्योजकांना खाजगी डॉक्टरांकडून तपासणी करून आरोग्य अहवाल संबधित विभागास द्यावा लागतो याचा खर्च प्रत्येक कर्मचाऱ्यांपाठी मागे अंदाजे रू. ५०० येतो आहे. हा उद्योजकांच्या माथी नाहक भूर्दंड आहे. याबाबत उद्योजकांच्या अनेक तकारी चेंबरकडे आलेल्या आहेत. औद्योगीक वसाहतीमधील उद्योजक हे आपल्या कर्मचाऱ्यांचा ई.एस.आय. चा हप्ता नियमित भरत असतात या हप्त्याचा सर्वात मोठा हिस्सा उद्योजक भरणा करत असतो. त्यामुळे कामगारांची वार्षिक दोन वेळा तपासणी ई.एस.आय. कडून व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.