कुपवाड – प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर साहेबांच्या विषयी अपशब्द वापरून त्यांची विटंबना करणाऱ्या रामगिरी महाराज याचेवर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी यासाठी कुपवाड शहरामध्ये समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढून कुपवाड शहर पोलीस ठाणे येथे लेखी तक्रार देण्यात आली.
त्या वेळी दर्गा सरपंच आयनुद्दीन मुजावर व दर्गा पंच कमिटी सदस्य, कुपवाड शहर संघर्ष समिती व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सनी धोतरे, पैलवान राजू भाई मुजावर, नासिरहुसेन मुजावर तसेच कुपवाड परिसरातील सर्व मस्जिदचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सर्व राजकीय पक्षातील राजकारणी पदाधिकारी उपस्थित होते.