
बस्तवडे ( ता. कागल ) : भारतीय बौद्ध महासभा , राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या तालुका नेतृत्वाखाली कागल तालुका , जि. कोल्हापूर , तालुका पदाधिकारी यांची मासिक मीटिंग २ , दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी भारतीय बौध्द महासभा जिल्हा अध्यक्ष साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांच्या घरी आयोजित करण्यात या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष हिरामणी कांबळे सर हे होते .. यावेळी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सातापा कांबळे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, कागल तालुक्यात भारतीय बौद्ध महासभा वाढ व विस्तार होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र प्रयत्न करूया व डॉ. बी.आर. आंबेडकर मल्टी स्टेट को. ऑपरेटिव्ह बँक शेअर्स सभासद जास्तीत जास्त होण्यासाठी कागल तालुक्यातील गावोगावी संपर्क करुन आदरणीय डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब यांना साथ सहयोग द्यावा असे आवाहन केले. तसेच यावेळी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख व लॉर्ड बुद्धा चॅनलचे वार्ताहर एम. डी. कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रबोधन पर साजरी करावी. याबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीचे प्रमुख उपस्थिती जिल्हा संस्कार प्रमुख नागेश कांबळे हे होते. या बैठकीत आयु.विष्णू कांबळे गोरंबेकर यांचा बँकेचा शेअर्स फार्म भरण्यात आला. कार्यक्रमासाठी तालुका उपाध्यक्ष निवास कांबळे तसेच कोषाध्यक्ष शंकर कांबळे , तालुका संघटक दत्तात्रय कांबळे ,नागेश गिरी शंकर नरके नवीन संघटक प्रभाकर कांबळे, धोंडीराम कोकरे, अशोक कांबळे , नामदेव कांबळे , व सोशल मीडिया प्रमुख सरदार कांबळे तसेच सौ. जयश्री कांबळे , सौ. आनंदी कांबळे इत्यादी प्रमुख हजर होते. शेवटी आभार कागल तालुका अध्यक्ष हिरामणी कांबळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त आभार मानले.* शेवटी तालुका कार्यकारणी पदाधिकारी यांनी प्रत्येक बैठकीस उपस्थित राहावे . अशा सूचना करून सदर बैठक पार पडली.