
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अल्पवयीन मुलांकडून दुचाकी वाहन चालवण्याचे प्रमाण वाढल्यामुळे व त्यातून गंभीर अपघात होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी कोल्हापूर वाहतूक शाखेकडून विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम राबवून दुचाकी वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या १५ पालकांवर तसेच वाहन मालकांवर गुन्हे दाखल केले असून त्यांची वाहने जप्त करण्यात आली.
वेळोवेळी कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध शाळांना भेटी देऊन वाहतूक नियमांबाबत सूचना, प्रबोधन दिले जाते.
ही कारवाई कोल्हापूर अधिक्षक यांच्या सुचनेनुसार, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर शहर वाहतूक शाखाचे पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.
अल्पवयीन मुलास वाहन चालवण्यास दिल्यास ही कारवाई होऊ शकते
- पालक किंवा मालक २५००० रुपये दंड आणि ३ वर्षापर्यंत तुरुंगवास
2.ज्या वाहनाचा वापर अल्पवयीन मुलाने केला आहे त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन (आर सी ) १२ महिन्यासाठी रद्द
3.संबंधित मुलावर बाल न्याय कायद्याअंतर्गत खटला चालवला जातो.
४.अल्पवयीन मुलास वयाची २५ वर्षे होईपर्यंत लायसन्स मिळवनेस अपात्र ठरतो.
वाहनचालक यांना अल्पवयीन मुलास वाहन चालवण्यास देऊन नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारकांवर कारवाईची मोहीम पुढील काळातही व्यापक स्वरुपात राबवण्यात येणार आहे तरी वाहनचालकांनी कायदेशीर कारवाई टाळावी असे आवाहन कोल्हापूर वाहतूक नियंत्रन शाखेचे पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे यांनी केले.