हुपरी मध्ये चांदी व्यवसाय करणाऱ्या युवकाचा मृत्यू, हुपरी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद..

Share News

हुपरी ( ता.हातकणंगले ) : येथील विशाल नगर भागात चांदी देण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय युवकाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली
हुपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम निवास जाधव ( व व २५ रा.घोटी बुद्रुक ता.खानापूर जि. सांगली ) हा युवक चांदी देण्यासाठी बुधवार ८ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ च्या सुमारास आशिष अण्णासो मोरे ( व.व.२६ रा. हुपरी ,विशालनगर ता.हातकणंगले ) यांच्याकडे चांदी पोहोच करण्याकरिता आला होता. सर्व देवाण घेवाण करून बाहेर येत असताना आशिष मोरे यांच्या दारातच त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. या अचानक घडलेल्या प्रकरणानंतर मोरेंनी तात्काळ खाजगी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले . सायंकाळी शवविच्छेदनासाठी हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही .याघटनेची वर्दी आशिष मोरे यांनी हुपरी पोलीस ठाण्यात दिली असून हुपरी पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!