‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा कागल तालुक्यात दिमाखात शुभारंभ

Share News

कागल पंचायत समिती येथे कार्यशाळेचे आयोजन; लोकसहभागातून आरोग्य क्रांती घडवण्याचा संकल्प

कागल : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कागल पंचायत समिती येथे तालुकास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण महाराष्ट्र अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याच्या संकल्पातून हे अभियान राबविण्यात येत आहे. केवळ उपचारच नव्हे, तर ‘प्रतिबंधात्मक उपाययोजना’ हे या मोहिमेचे मुख्य सूत्र असून, स्वच्छ पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण आणि जीवनशैलीशी निगडित आजारांवर नियंत्रण मिळवणे हे या अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

लोकसहभागातून अभियान यशस्वी करा: सभापती कार्यशाळेचे मार्गदर्शन करताना पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील पाटील मॅडम म्हणाल्या की, “कागल तालुक्यामध्ये हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी संपूर्ण लोकसहभाग आणि सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे. हे अभियान केवळ आरोग्य विभागाचे नसून, एक ‘टीम’ म्हणून काम केल्यास आपण कागल तालुका आरोग्यदृष्ट्या आदर्श बनवू शकतो.” यावेळी उपसभापती इंद्रजीत पाटील साहेब यांनीही आपले विचार व्यक्त करत अभियानाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अभियानाची मुख्य वैशिष्ट्ये व अंमलबजावणी : तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख देसाई
यांना अभियानाच्या उद्देशावर प्रकाश टाकला. त्यांनी खालील मुद्द्यांवर विशेष भर दिला.
गट विकास अधिकारी कुलदीप बोगे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यामध्ये सहभागी होत असून राज्यस्तरांमध्ये कागल तालुका अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली.
पंचायत समिती उपसभापती माननीय डॉ. इंद्रजीत पाटील यांनी या अभियानामध्ये सर्व विभागणी सहभागी होण्यासाठी आव्हान केले.

प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा : स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनातून आजारांना अटकाव करणे.

माता-बाल आरोग्य : गरोदर माता आणि बालकांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे.

मानसिक आरोग्य : बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक व शारीरिक व्याधींचे नियंत्रण.

क्षेत्रीय स्तरावरील कार्य : समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहचणे.

या कार्यशाळेस पंचायत समितीचे सर्व माननीय सदस्य, गटविकास अधिकारी कुलदीप बोगे , तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानामुळे कागल तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण होऊन, नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा लाभ मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!