कागल मध्ये १४ ते १८ एप्रील भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन..

Share News

कागल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अक्षय शेळके साहेब प्रेमी यांच्यावतीने या भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हे स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे कागल मधील शाहू महाराज क्रीडांगण येथे या स्पर्धा दिवस रात्र क्रीडा प्रकारात भरवल्या गेल्या आहेत
येत्या १४ एप्रिल पासून स्पर्धेची सुरुवात होणार असून १८ एप्रिल रोजी या स्पर्धेचा फायनल सामना रंगणार आहे.
या स्पर्धेत कर्नाटकसह महाराष्ट्र राज्यातील एकूण ३२ क्रिकेट संघानी सहभाग नोंदवला आहे तर टेनिस क्रिकेट मधील स्टार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १५१००० रु द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १०१००० रु इतके आहे , तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक ३१००० रु इतके आहे , यासह वयक्तिक पारितोषिक साठी इलेक्ट्रिक बाईक आणि सायकल ठेवण्यात आली आहे.
मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी स्पर्धा काटेकोर आणि भव्यदिव्य पार पाडू असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!