
वडणगे (ता. करवीर ) : वडणगे गावात दत्तात्रय कॉलनी सह. गृहनिर्माण संस्थेच्या ओपन स्पेसमध्ये सुरू होत असलेल्या ग्रामपंचायती मार्फत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला तेथील रहिवाशी यांनी विरोध केला आहे.
केवळ राहत्या घरापासून ५० फूट अंतरावर हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभरण्याचा आहे.या प्रकल्पामुळे गंभीर आशा समस्या निर्माण होऊ शकतात .तीव्र दुर्गंधी ,मच्छर व कीटकांचा भरपूर प्रमाणात वाढ होऊन आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो तसेच भूजल ,विहिरीतील पाणी दूषित होऊ शकते. रहिवाशी भागात पर्यावरणाला आणि आरोग्यास गंभीर आशा समस्या निर्माण होऊ शकतात.या सर्व बाबींचा विचार केला पाहीजे असे सांगण्यात आले

रहिवाशांनी काही शंका उपस्थित केल्या की, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प साठी महाराष्ट्र् अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्या कडून परवानगी घेतली आहे का?
जल (प्रदूषण प्रतिबंध व प्रदूषण) अँक्ट १९७४,
पर्यावरण संरक्षण अँक्ट१९८६,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे नियम ,ग्रामपंचायत विकास आराखडा (DP Plan) /झोनिंग नियम, गृहनिर्माण संस्थेच्या ओपन स्पेसमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प उभारणे कायदेशीर आहे का?
प्रकल्पासाठी आवश्यक किमान अंतराचे नियम पाळले आहेत का?, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० ,
नुसार गृहनिर्माण संस्थेच्या ओपन स्पेसमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प उभारणे नियमबाह्य आहे, म्हणून विनंती करण्यात आली.
सदर प्रकल्प तात्काळ थांबवावा अथवा स्थलांतरित करावा ,संबंधित नियमांचे पालन करावे ,रहिवाशांच्या आरोग्याचे संरक्षण करावे
यासर्व शंका लक्षात घेऊन हा प्रकल्प अन्यत्र कुठेही हलवावा अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यास पर्याय स्वीकारावा लागेल. असा निवेदनातून इशारा दत्तात्रय कॉलनी सहगृहनिर्माण संस्था यांनी दिला आहे.