
कागल : कागल शहरामधील शिवनेरी पार्क , अनंत रोटो तेथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली, याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रफिक गौस सय्यद ( व व ५३, रा.शिवनेरी पार्क, अनंत रोटो ता. कागल जि. कोल्हापूर ) या होलसेल औषध विक्री व्यवसायिक यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने तब्बल २१ लाख रुपयांचे त्यात रोख रक्कम १० लाख आणि ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण २१ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० च्या दरम्यान ही घटना घडली . मुख्य दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून आत प्रवेश केला त्यांनंतर बेडरूममध्ये ठेवलेल्या तिजोरीचा दरवाजा उचकटून त्या मधील रोख रक्कम १० लाख रुपये आणि
११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्यात (सोन्याचा नेकलेस,सोन्याचा राणीहार,सोन्याची साखळी चेन,सोन्याच्या ४ वळ्याच्या अंगठ्या ) चोरून नेले . रफिक सय्यद यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. कागल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.घटना स्थळी कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे आणि करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी जाऊन पाहणी केली. कागल पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनांमुळे कागल शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी अधिक वेगाने तपास सुरू केला आहे.