रेंदाळ येथील कापड दुकानातील चोरीचा गुन्हा उघड करण्यात हुपरी पोलिसांना यश, दोन आरोपी जेरबंद,आरोपीकडून ३० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल व मोटरसायकल हस्तगत

Share News

हुपरी : हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील तात्या मेन्स वेअर गोडाऊन मधून २ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री ते ९ फेब्रुवारी २०२६ च्या सकाळ दरम्यान कापड गोदऊनचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून एकूण सुमारे ८८ हजार २०० रुपयांचा कापड माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्यात आले होता याबाबत तुषार अण्णासो पुजारी यांनी हुपरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती

सदर गुन्ह्याचा तपास कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या सूचनेनुसार हुपरी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे आणि त्यांचे पथक दत्तात्रय बांगर ,युवराज कांबळे व सताप्पा चव्हाण हुपरी होमगार्ड पथकातील परशुराम चोपडे, किरण पवार, रियाज मुल्ला आणि अनिल पाटील यांनी विविध सीसीटीव्ही तपासून गोपनीय माहितीद्वारे माहिती घेतली. संशयित आरोपी हे करवीर तालुक्यातील कणेरी गावातील तळ्याजवळ लपून बसल्याचे गोपनीय माहिती मिळाली याप्रमाणे पथकाने सापळा रचला. सापळा रचल्याचे चाहूल लागताच आरोपी हे उसात लपून बसले. पोलीस पथकाने उसात शोध घेऊन आरोपी प्रमोद विश्वास वडर ( व व २५ रा. हुपरी ) व हतीम इस्माईल मुलाणी ( व व ३० रा हातकणंगले ) या दोघांना ताब्यात घेतले त्याच्या जवळील चोरी केलेल्या माला पैकी ३० हजार ७०० रुपयांचा माल आणि चोरी करण्यासासाठी वापरलेली मोटरसायकल हस्तगत करून एकूण ७० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला गुन्ह्याचा अधिक तपास हुपरी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस दत्तात्रय बांगर करीत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!