कागलमध्ये महिलेच्या गळ्यातील मानिमंगळसूत्र हिसडा मारून घेऊन पलायन, दोन अज्ञाताविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Share News

कागल : कागल शहरातील जयसिंगराव पार्क येथील अशोका हॉटेल जवळ गिरनार मेडिकल शॉप मध्ये महिलेच्या गळ्यातील मानिमंगळसूत्र हिसडा मारून पळून गेल्याची घटना घडली.
कागल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास अशोका हॉटेल जवळ असलेल्या गिरनार मेडिकल शॉप मध्ये एक युवक तोंडाला रुमाल बांधून साधारण रंग काळा सावळा २५ ते ३० वयोगटातील युवक अलर्जीची गोळी मागण्यासाठी आला.आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री केली आणी सौ.तनुजा अभिजित साठे ( व व ३३ रा.अतिश बेकरी, जयसिंगराव पार्क,ता.कागल, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील मानिमंगळसूत्र व गोळ्याचे पाकीट हिसडा मारून बाहेर एक युवक गाडी चालू करून मोटरसायकल वर बसलेला होता त्या मोटोरसायकल वर बसून दोघे पळून गेले.साधारण १३ ग्रॅम वजनाचे,१ लाख 30 हजार रुपये किमतीचे होते. अचानक या घडलेल्या प्रकारामुळे सौ. तनुजा साठे घाबरून गेल्याने त्यांना गाडी कोणत्या कंपनीची आहे गाडीचा नंबर काय आहे रंग कोणता होता हे पाहता आले नाही. सदरची तक्रार ही सौ तनुजा साठे यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली. दोन अज्ञाताविरुद्धा कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस उपनिरीक्षक तावरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!