हुपरी येथे जमावबंदी आणि शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकारणी एका तरुणावर गुन्हा दाखल..

Share News

हुपरी (ता.हातकणंगले) : हुपरी येथे २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी पावणे १२ च्या सुमारास अंबिका नगर येथील अतुल करडे यांच्या प्लॉटिंग मध्ये संशयित आरोपी संकेत सतीश वाईंगडे (रा नेहरू चौक, हुपरी,ता.हातकणंगले जि. कोल्हापूर) याच्याकडे बेकायदेशीरपणे धारदार पात्याची लोखंडी तलवार आढळून आली. जमाव बंदी शस्त्रेसाठा ,तलवारी , भाले ,सूऱ्या लाठी यासारख्या शारीरिक इजा होईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार शस्त्र बंदी लागू असताना आरोपीने तलवार जवळ बाळगून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद पोलीस कर्मचारी महादेव मुरारी रानगे हुपरी पोलीस ठाणे यांनी दिली असून ही कारवाई हुपरी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे ,पोलीस साताप्पा चव्हाण, महादेव रानगे, होमगार्ड किरण पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!