कागल शहरात २७ एप्रिल पासून दर सोमवारी पाणी पुरवठा पूर्णवेळ बंद, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन..

Share News

कागल : कागल शहरातील सर्व नळ धारकांना असे आवाहन करणेत येते की हवामान विभागाने या वर्षी पावसाचे प्रमाण कमी सांगितले आहे तसेच सद्यस्थिती मध्ये शहराला पाणीपुरवठा करणा-या जयसिंगराव तलावात पाण्याची पातळी कमी झालेली असलेने दि.२७ एप्रिल २०२६ पासून दर सोमवारी पाणीपुरवठा पूर्णवेळ बंद करणेत येत आहे व शहरामध्ये पाणी सोडणेच्या वेळेमध्ये कपात करणेत येत आहे. याची नोंद घ्यावी व उपलब्ध होणारे पाणी काटकसरने वापरून नगरपरिषदेस सहकार्य करावे.

तसेच नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करावे :

  1. नळ कनेक्शनला तोटया (कॉक) बसवून घ्याव्यात. पाणी भरून झालेवर तोटी बंद करावी.
  2. पिण्याचे पाणी शौचालये, गटारीमध्ये, रस्त्यांवर सोडून पाण्याची नासाडी करू नये.
  3. नळाला विद्युत मोटार लावलेले आढळलेस सदर मोटार जप्त करून नळधारकवर कायदेशीर कारवाई करणेत येईल.
  4. साठवण टाक्यावर फ्लोटिंग व्हॉल्व बसवून घेऊन पाण्याचा अपवय्य टाळावा.
  5. पावसाळ्यात पाणी गाळून उकळून प्यावे.
  6. पाणी सोडणारे कर्मचारी यांना जादा पाणी सोडणेसाठी आग्रह अथवा दमदाटी करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या परिस्थितीत नागरिकांनी उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन कागल नगरपरिषद मुख्यधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!