कागल येथे भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न ; अनेक तरुणांना रोजगाराची संधी..!

Share News

राजे समरजीतसिंह घाटगे आणी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कागल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंतराव रावण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा संपन्न..

कागल : संत रोहिदास विद्या मंदिर, कागल येथे ब्रेनी टेक्नॉलॉजी यांनी कागल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंतराव कृष्णराव रावण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला एकदिवसीय भव्य रोजगार मेळावा आज अत्यंत उत्साहात आणी यशस्वीरीत्या पार पडला. या मेळाव्यात नामांकित कंपन्यांच्या थेट मुलाखतींच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
28 हून अधिक कंपन्यांचा सहभाग, थेट नियुक्ती :
या रोजगार मेळाव्यात कागल फाइव्ह स्टार, गोकुळ शिरगाव एम आय डी सी, कोल्हापूर शहर मधील मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, आणी सर्व्हिस सेक्टर मधील 28 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला.
यामध्ये ४०० हून अधिक विविध पदासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. विशेष म्हणजे मेळाव्यात अनेक फ्रेशर्स आणी अनुभवी उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून जागेवरच नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली

या मेळाव्यात १० वी , १२ वी पास, आयटीआय,पदवीधर ( सर्व शाखा ), डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल ) आणी तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. एकशे पन्नास हून अधिक सुयोग्य निवड झालेल्या तरुण-तरुणींना चांगल्या वेतनावर विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती मिळाली आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी तज्ञांकडून उमेदवारांना करिअर मार्गदर्शन, मुलाखत कौशल्ये आणी उद्योगजकतेबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.ग्रामीण व शहरी भागातील तरुणांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

या उपक्रमामुळे युवकांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एकाच छताखाली अनेक संधी मिळाल्या. उपस्थित मान्यवरांनी निवड झालेल्या उमेदवाराचे अभिनंदन केले आणि यापुढेही असे रोजगार मेळावे आयोजित केले जातील अशी ग्वाही दिली.
यावेळी कागल नगरपरिषदेचे नगरसेवक अरुण गुरव, नगरसेवक उमेश सावंत, नगरसेवक अर्जुन नाईक, नगरसेवक प्रवीण काळबर,सामाजिक कार्यकर्ते नवाज मुश्रीफ आदी उपस्थित होते. तसेच कागल नगरपरिषदेचे नगसेवक व नगरसेविका यांनी सदिच्छा भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!