कागल मध्ये नामदार चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा उत्साहात साजरी

Share News

हॉटेल न्यू डॅझल नायक इलेव्हन विजेता तर RMS प्रणित पन्हाळा टायगर्स उपविजेता

कागल : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कागल तालुक्यातील हॉटेल न्यू डॅझल न्यू नायक इलेव्हन या संघाने विजय प्राप्त केला
विजयी संघास १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख व पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या RMS प्रणित पन्हाळा टायगर्स या संघास १ लाख १ हजार आणि चषक देऊन गौरविण्यात आले….
तृतीय क्रमांक अमन आवटे युवा मंच तर चतुर्थ क्रमांक प्रकाशरावजी गाडेकर साहेब प्रेमी या संघाने मिळवला त्यांना रोख ३१ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले…..
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संदीप मकवाना ठरला त्याला इलेक्ट्रिक बाईक देऊन सन्मानित करण्यात आले तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मयूर शेलार तर सर्वोत्कृष्ट फलंदाज झैलसिंग पाटील ठरला या दोघांना सायकल आणि रोख २००० रुपये देऊन सन्मानित करण्यात आले , अंतिम सामन्यात सामनावीर अक्षय वाठारकर ठरला
स्पर्धेचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले तर बक्षीस समारंभास भैया माने , शशिकांत खोत, सौरभ पाटील , अमित पिष्टे , डॉ तुषार भोसले , विवेक लोटे , संजय चितारी , राहुल चौगले , शशिकांत नाईक , नितीन कांबळे अक्षय शेळके यांच्या हस्ते पार पडला…
या स्पर्धेचे आयोजन अक्षय शेळके साहेब प्रेमी यांच्या वतीने करण्यात आले होते तर स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते
डे नाईट सामन्यांचे कागल मधे तब्बल १७ वर्षानंतर आयोजन करण्यात आले होते, स्व नायक मकवाना यांच्या मुलाची शैक्षणिक साहित्याची जबाबदारी अक्षय शेळके साहेब प्रेमी नामदार चषक कमिटी यांच्यावतीने घेण्यात आली याचे कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!