
कागल : अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जनक तथा ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी नाना याना पुण्यतिथी निमित्त कागल तालुका ग्राहक पंचायत यांच्या वतीने फोटो पूजन करून अभिवादन करण्यात आले
जयसिंगराव पार्क येथे फोटोपूजन जिल्हा महिला आयोग अध्यक्षा शोभा खोत आणि कागल तालुका अध्यक्ष योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले तर राम मंदिर खर्डेकर चौक येथे फोटोपूजन सामाजिक कार्यकर्त्या विजया निंबाळकर आणि राम मंदिर ट्रस्ट समिती सदस्य चंद्रकांत बोंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी तालुका अध्यक्ष योगेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्राहक पंचायतीची उद्दिष्टे , योजना , धोरणे , ग्राहकांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन केले
ग्राहकांच्या हक्कांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना बिंदू माधव जोशी यांनी केली , ग्राहकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले काम अतिशय प्रेरणादायी आहे
या पुण्यतिथी कार्यक्रमास अखिल भारतीय कागल तालुका यांच्या वतीने सचिव स्वप्नील हातकर तालुका उपाध्यक्ष संदीप कांबळे , शहर प्रमुख विशाल पाडळकर , शहर कोषाध्यक्ष प्रशांत दळवी , शहर सचिव नंदकुमार पोतदार , परिवहन अध्यक्ष नितीन नासीपुडे , ग्राहक विठ्ठल निंबाळकर , अशोक दळवी , पद्मिनी शिंदे , मनीषा दळवी आदी उपस्थित होते