कागल महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान ( टप्पा – १ )

Share News

कागल : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राज्यातील नागरिकांचे प्रलंबित महसुली प्रश्न आणि दैनंदिन कामे एकाच छताखाली जलदगतीने निकाली काढण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान (टप्पा १) राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने तहसिलदार कार्यालय, कागल अंतर्गत मौजे कागल ता. कागल येथे दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी साडे ९ वाजता महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख सुविधा : या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित भोगवटादार वर्ग२ जमीनी वर्ग१ करणे, सामाजिक अर्थ सहाय्य योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेणे मंजूर करणे, तुकडेबंदी सुधारणा नुसार प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या हस्तांतरण नोंदी मंजूर करणे, वय, नॅशनॅलीटी डोमिसाईल, उत्पन्न, रहीवास, जात आणि इतर विविध दाखल्यांचे वाटप, फेरफार नोंदींचा निपटारा, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, नवीन महसूल सुधारणांची माहीती, याच प्रमाणे बळीराजा पाणंद रस्ते मोहीम, कमी जास्त पत्रक तयार करणे या सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

पुरवठा विभाग : पुरवठा विभागाकडील संगणकीकृत शिधा पत्रिकाचे वाटप होणार आहे.
आरोग्य विभाग : आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे
कृषी विभाग : कृषी विभागामार्फत शेती अवजारे यांचे लाभ वाटप तसेच पीएम किसान, अॅग्रीस्टॅक नोंदणी होणार असून इतर कृषी विषयक बी बियांणाची माहीती देण्यात येणार आहे.
महिला व बालविकास विभाग : महीला व बालविकास विभागा मार्फत प्रधान मंत्री मातृवंदना योजना, घरपोच आहार, लेक लाडकी योजना, बेटी बचाव बेटी पढाओ व बाल आधार योजनांचा लाभ व माहीती देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत विभाग : ग्रामपंचायत विभाग यांचेकडील विविध योजनांची माहीती व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच आधार अद्यावतीकरण, बचत गट यांच्या सेवा देण्यात येणार आहेत.

कागल नगर परिषद : नगरपरिषद कागल यांचेकडील महीला बचतगटांना बँक कर्ज वितरीत करणे, दीनदयाळ अंत्योदय योजना NULM, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, नगरपरीषद बांधकाम परवाना, ना हरकत दाखला, नळ जोडणी, फेरफार इत्यादी कामकाज करणेत येणार आहे.

राज्य परिवहन मंडळ : राज्य परिवहन महामंडळ कागल (ST) यांचेकडून अमृत जेष्ठ नागरीक ७५ वर्षावरील मोफत, जेष्ठ नागरीक ६५ वर्षे ते ७५ पर्यंत ५०% सवलत, महीला ५०% सवलत १ जून पासून कार्ड/ओळखपत्र असल्या खरेजी मोफत अथवा सवलतीचे दरामध्ये प्रवास करता येणार नाहीत.

त्यानुसार सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अमरदीप वाकडे ,तहसिलदार कागल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!