वेटरन्स क्रिकेट असोसिएशन सगली मार्फत वुमेन्स टी 20 क्रिकेट प्रीमियर लीगचे ऑक्शनला( लिलाव प्रक्रिया) उस्फूर्त प्रतिसाद

कुपवाड – वेटरन्स क्रिकेट असोसिएशन, सांगली व सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुपवाड एमआयडीसी येथे दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी वुमन्स टी -20 क्रिकेट प्रीमियर लीग ऑक्शन लिलाव प्रक्रियेचा मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्री संजय बजाज खजिनदार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व अध्यक्ष सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन व मा उदय शिंदे अध्यक्ष सांगली जिल्हा वेटरन्स क्रिकेट असोसिएशन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन तसेच स्पर्धेसाठी भव्य दिव्य ट्रॉफी चे अनावरण करण्यात आले यावेळी सागर बिरजे व सचिन जगदाळे उपाध्यक्ष वेटरन्स क्रिकेट असोसिएशन अभिजीत कदम सचिव प्रकाश फाळके खजिनदार त्याचबरोबर धर्मेंद्र खिलारे व रुपेश पारेख, संजय काळोखे, उदय पाटील विनायक जोशी सर्व संचालक वेटरन्स क्रिकेट असोसिएशन आदी मान्यवर उपस्थित होते या ऑक्शन सांगली जिल्ह्यातील जवळजवळ 100 महिला क्रिकेट खेळाडू व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या स्पर्धा 22 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत नव कृष्णा व्हॅली क्रीडा संकुल एमआयडीसी येथे होणार आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्शन चे आयोजन केले होते. यासाठी चार संघ तयार करण्यात आले त्यासाठी चार ओनर नी ते संघ घेतले असून त्यामध्ये प्रामुख्याने अहिल्यादेवी डायमंड-राकेश उबाळे, जिजाऊ पॅंथर रोहित वाले व संजय देवकुळे ,ताराराणी चॅम्प-सुमित स्पोर्ट्स, झाशी वॉरियर-बळेश्वर क्रिकेट क्लब असे संघाचा नावे देण्यात आले आहेत व सदर संघ या क्रिकेटशौकिनाने घेतलेले आहेत. याप्रसंगी संजय बजाज खजिनदार महाराष्ट्र क्रिकेटर असोसिएशन चे झाल्याबद्दल त्यांचा भव्य दिव्य स्मृतिचिन्ह व बुके देउन सत्कार श्री उदय शिंदे सागर बिरजे व सचिन जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रथम स्वागत व प्रास्ताविक श्री विनायक जोशी यांनी केले यामध्ये क्रिकेट असोशियन चा थोडक्यात आढावा घेत त्यांनी महिला क्रिकेटर ना चांगली संधी मिळावी या उद्देशाने स्पर्धा घेण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर
अभिजीत कदम यांनी सांगलीमध्ये प्रथमच महिला खेळाडू साठी अशा स्पर्धेचे प्रथमच महाराष्ट्रात सांगली येथे आयोजन करण्यात आले आहे. तसेच क्रिकेट स्पर्धेची संपूर्ण माहिती सांगत या स्पर्धेचे ऑक्शन लिलाव प्रक्रियासाठी आलेल्या सर्व खेळांची स्क्रीनवर माहिती सांगून प्रत्येक संघास एक लाख पॉईंट देण्यात आले होते त्यामध्येच त्यांनी पंधरा खेळाडूंची निवड करण्याची होती त्यासाठी प्रत्येक खेळाडूची सविस्तर माहिती स्क्रीनवर दाखवत त्या खेळाडूला कोणता संघ जास्त पॉईंट देईल त्यास तो खेळाडू दिला जात होता अशा पद्धतीने ऑक्शन उत्साहात संपन्न झाले. यानंतर सर्व खेळाडू व पालकांना भोजनाची व्यवस्था केली होती
सदर ऑक्शन लिलाव प्रक्रियेमध्ये सर्वात महागडे खेळाडू पुढील प्रमाणे ठरले

  1. श्रेया जेऊर अहिल्यादेवी डायमंड 31000 पॉईंट
  2. तनिष्का माळी ताराराणी चॅम्प्स 26500 पॉईंट
  3. भावी पुनमिया जिजाऊ पँथर्स 23000 पॉईंट
  4. सरस्वती कोकरे झाशी वॉरियर्स 22000 पॉईंट
  5. ऋतू जामदार ताराराणी चाम्पस 24000 पॉईंट
  6. विधी दळवी जिजाऊ पँथर्स 17000 पॉईंट
  7. अनुजा खंडागळे जिजाऊ पॅंथर्स 16500 पॉइंट
  8. रूत अवॉड अहिल्यादेवी डायमंड -14,500 पॉईंट

हे या ऑक्शनचे हिरो खेळाडू ठरले

तसेच या स्पर्धेसाठी आयकॉन खेळाडू पुढील प्रमाणे
1.जिजाऊ पँथर्स कृषी ठक्कर
2.अहिल्यादेवी डायमंड्स अनुश्री स्वामी

  1. झाशी वॉरियर्स निधी संभवन
  2. ताराराणी चॅम्प्स सायली मोहिते
    वरील खेळाडू हे संघाचे आयकॉन प्लेयर तसेच या संघाचे कर्णधार आहेत. सर्व आमचे आभार श्री प्रकाश फाळके यांनी मांडले.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!