
कागल : एका विवाहित डॉक्टर महिलेला हुंड्यासाठी तसेच तलाकची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॉ. सौ. स्वालेहा मुस्तफा नवाब (वय 27, व्यवसाय डॉक्टर) या असून त्या सध्या कागल येथे वास्तव्यास आहेत. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, पती मुस्तफा नवाब, सासरे रियाज नवाब, सासू तरनूम नवाब तसेच चुलत सासू-सासरे आणि दीर यांनी नवीन हॉस्पिटल बांधणे व चारचाकी वाहन घेण्यासाठी दबाव टाकत, अन्यथा तलाक घेण्याची धमकी देत वारंवार शिवीगाळ व छळ केला. तसेच, लहान दीर मुरतजा नवाब याने गैरवर्तन करत लज्जास्पद कृत्य केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.