
जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तीप्रदर्शन
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १७ मधून जनसुराज्य शक्ती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीच्या अधिकृत उमेदवार सौ. वैशालीताई दत्ता मिसाळ यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला. हा अर्ज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना जनसुराज्य शक्ती व आरपीआय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरात घोषणाबाजी करत उत्स्फूर्त शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) म्हणाले की, “सौ. वैशालीताई मिसाळ या जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि कार्यक्षम नेतृत्व आहेत. जनसुराज्य शक्ती–आरपीआय युतीच्या माध्यमातून त्या प्रभाग क्रमांक १७ च्या विकासाला गती देतील.”
सौ. वैशालीताई दत्ता मिसाळ यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, “प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार आहे.” सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रभाग क्रमांक १७ मध्ये निवडणूक वातावरण तापले असून, जनसुराज्य शक्ती–आरपीआय युतीने या प्रभागात मजबूत दावा केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष गुणवंत नागटीळे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, शहर अध्यक्ष सुखदेव बुद्ध्याळकर,कोल्हापूर कामगार आघाडी कार्याध्यक्ष राहुल कांबळे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे ,आप्पा मोठे, अजय डोलारे, संतोष डोलारे, दत्ता सूर्यवंशी , अशोक कांबळे, तानाजी मिसाळ, सुशील कांबळे, युवराज कांबळे, शिवराम बुद्धाळकर , पंकज आठवले यांच्या सह रिपब्लिकन पक्षाचे व जन स्वराज्य पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.