
कोल्हापूर : उजळाईवाडी परिसरात झालेल्या भीषण अपघातात ६२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विशाल अशोक दांगट (वय २५, रा. गडमुडशिंगी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे चुलते तानाजी बापु दांगट (वय ६२) हे काल सकाळी साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून गोकुळ शिरगाव एमआयडीसीकडे जात होते. पुणे बेंगलोर महामार्गावर स्वामी विवेकानंद हायस्कूलसमोरील बोगद्यावर आरोपी निलंजन मंजुम याने ताब्यातील चारचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवून समोरून जोराची धडक दिली. या अपघातात तानाजी दांगट यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास गोकुळ शिरगाव पोलीस करत आहेत