
कागल : कागल मधील मोकळ्या जागेत, माळरानात अंधाराचा फायदा घेत दारू पिण्यास बसलेल्या तळीरामांवर कागल पोलिसांनी रात्री कारवाई केली
३१ डिसेंबर च्या अनुषंगाने कागल पोलिसांनी पेट्रोलिंग करत तब्बल ९ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले
यामध्ये अवधूत संजय कदम (व.व २० रा. गुरूवार पेठ, कागल ), नितीन अरुण चव्हाण (व.व २० रा. कोष्टी गल्ली,कागल) , अथर्व सचिन चौगले (व.व १९ रा. शिवाजी चौक कागल) , वैभव दिनकर हेगडे (व व ३२ रा. दावणे गल्ली, कागल) , सुरेश बाबाजी मकवाणे (व.व ४९ रा. वड्डवाडी, गोसावी वसाहत कागल) , इम्रान नबीसाब शेडबाळे (व.व २७ रा. मातोश्री गिरिजानगर, कागल) , लक्ष्मण दिलीप सोकानावर (व.व२९ रा शाहूनगर, बेघर वसाहत ,कागल) , शंकर विष्णू कळसाने व.व २४ रा. पिंपळवाडी सध्या राहणार शाहू कारखाना , कागल )राणुजी बाबुराव साळवे व.व ४० रा. पिंपळवाडी सध्या रा.शाहू कारखाना, कागल) अशी गुन्हा दाखल झालेल्या तळीरामांची नावे आहेत
त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे
कागल मध्ये सध्या ओपन बार चे प्रमाण वाढलेले असून अल्पवयीन मुले देखील व्यसनाच्या आहारी गेले असून पोलिसांनी अशी कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत
या कारवाई मध्ये कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ए जी कांबळे , एस बी भाट , पोलीस कॉन्स्टेबल अरुण गोविंद कांबळे , पोलीस नाईक राजेंद्र रघुनाथ पाटील , पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण आपके , पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही टी पाटील , सहाय्यक फौजदार डोईफोडे , पोलीस हेड कॉन्स्टेबल चिंतामण कांबळे , पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव , सुरेश पाटील , पोलीस अंमलदार जाफर कुरणे , पोलीस हेड कॉन्स्टेबल एस पी गुरव पोलीस हेड कॉन्स्टेबल माने , एएसआय कोचरगी , पोलीस हेड कॉन्स्टेबल ए एस पाटील यांनी ही कारवाई केली
पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.