
कागल : पिंपळगाव खुर्द ( ता कागल ) येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २८ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली
अक्षय सुभाष नवाळे ( व व ३० रा पिंपळगाव खुर्द ता कागल) याने रावसाहेब सातपुते यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारीच्या पेटीला असलेल्या लोखंडी ॲगलला वैरणीच्या दोरीने गळफास घेतलेले आढळले. त्याला बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालय कागल येथे नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही
याप्रकरणाची माहिती विनायक विजय नवाळे यांनी पोलिसांना दिली घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास कागल पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस जाधव करीत आहेत.