
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर १५१ पॅसेंजर वाहतूक रिक्षावर कारवाई करण्यात आली.
दि.१५ एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ रोजी शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गणवेश परिधान न करणे, रिक्षा स्टॉपवर ज्यादा वाहने लावणे, रिक्षा मधून ज्यादा प्रवाशी बसवून वाहतूक करणे, लायसन्स जवळ न बाळगणे, स्टॉप सोडून इतरत्र रिक्षा थांबवणे, ज्यादा भाडे आकारणे, चालकाच्या शेजारी प्रवाशी बसवणे इत्यादी समाविष्ट आहे. या सर्व उल्लंघनांवरून एकूण ७७ हजार रुपये दंड आकारण्यात आला.
कोल्हापूर शहरातील रिक्षा चालकांना आवाहन करण्यात आले की, रिक्षा चालकांनी ड्रेसकोडचा वापर करावा,नियमबाह्य भाडे आकारू नये,पॅसेंजर यांच्याशी अरेरावी करू नये,ज्यादा भाडे आकारू नये, रिक्षामध्ये बसून वाहतुकीस अडथळा आणू नये,वरील सर्व सूचनांचे पालन करावे. जे रिक्षा चालक किंवा मालक वरील सूचनांचे पालन करणार नाहीत अथवा दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करतील अश्या रिक्षा चालक किंवा मालक यांच्यावर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. सदरची कारवाईची मोहीम ही पुढील काळात व्यापक स्वरूपात सुरू राहणार आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार कोल्हापूर उपविभागीय पोलीस अधिकारी,यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर वाहतूक शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी व कार्यालयातील स्टाफ यांनी केली.