राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त डी.आर. माने महाविद्यालय कागल येथे व्याख्यानमाला

Share News

कागल : २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन व ग्राहक जागरण मास याचे औचित्य साधत विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल तालुक्याच्या वतीने आज डी. आर.माने महाविद्यालयात ग्राहक दिनाचे महत्व या विषयावर विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कॉलेज चे प्राचार्य नंदकुमार कदम सर तर प्रमुख उपस्थिती डॉ. प्रवीण चौगले यांची होती.
यावेळी ग्राहक पंचायतीचे कागल तालुका अध्यक्ष योगेश कदम यांनी व्याखानमालेत बोलताना सांगितले की , विद्यार्थी आणि ग्राहक यांनी दैनंदिन जीवनातील विविध समस्या सोडवण्यासाठी ग्राहक म्हणून प्रत्येक वस्तू आणि सामान याची वैधता तपासावी , आपली फसवणूक टाळण्यासाठी सजग राहावे. ग्राहकांचे हक्क व कर्तव्य यासह विविध विषयावर मार्गदर्शन केले.
ऑनलाईन फसवणूक अलीकडच्या काळात खुप वाढलेली असून त्याबद्दलची सुरक्षितता कशी ठेवावी याचे विश्लेषण ग्राहक पंचायतीचे कोषाध्यक्ष प्रशांत दळवी यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ग्राहक जनजागृती साठी तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे उद्घाटन प्राचार्य नंदकुमार कदम सर आणि ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष योगेश कदम ग्राहक पंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक सौ.अंजली पाटील मॅडम यांनी केले , पाहुण्यांची ओळख प्राध्यापक राजेंद्र मोगणे यांनी करून दिली. तर आभार प्राध्यापक प्रदिप काळूगडे यांनी मानले.

या व्याख्यानमालेस बी.कॉम च्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या सुमारे १२५ मुलांनी सहभाग घेतला होता.
यावेळी ग्राहक पंचायत महिला जिल्हा आयोग अध्यक्षा सौ.शोभा खोत , तालुका अध्यक्ष योगेश कदम , तालुका उपाध्यक्ष संदीप कांबळे , तालुका उपाध्यक्ष आण्णासो कुंभार सर ,तालुका सह सचिव स्वप्नील हाटकर ,शहर सचिव नंदकुमार पोतदार ,शहर कोषाअध्यक्ष प्रशांत दळवी कॉलेज चे विद्यार्थी कर्मचारी शिक्षकवृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!