
पट्टणकोडोली : (ता. हातकणंगले) हुपरी उपविभाग येथे कंत्राटी कामगारांची बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात हि कार्यकारणी पट्टणकोडोली येथील स्वराज हॉटेल येथे पार पडली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्कल उपाध्यक्ष किरण माळी तसेच राजेंद्र ढाले -अध्यक्ष – कोल्हापूर ग्रामीण विभाग दोन सुरेश डवर कोषाध्यक्ष – कोल्हापूर ग्रामीण विभाग दोन कुमार वनीरे अध्यक्ष- कागल सब डिव्हिजन अध्यक्ष उपस्थित होते आज झालेली ही निवड कामागारानी हातवर करुन एकमुखाने करण्यात आली.पुढील प्रमाणे कार्यकारणी
- अविनाश चंद्रकांत कांबळे – अध्यक्ष
- केदार प्रकाश दैव – उपाध्यक्ष
- अक्षय प्रकाश पाटील – कार्याध्यक्ष
- अक्षय अशोक रेडेकर – कोषाध्यक्ष
- प्रकाश लक्ष्मण कोरवी – खजिनदार
- विशाल हनुमंत ठाकूर – सचिव
- सुरज प्रकाश सुतार – सहसचिव निवड करण्यात आल्या. ग्रामीण विभाग-2 चे अध्यक्ष राजेंद्र ढाले यांनी आज पर्यंत संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेतला हुपरी येथील विभागातील सर्व कामगारांना बांधवांना संघटना आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि इथून पुढे ठामपणे आपल्या सोबत राहील हुपरी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या शाखा कार्यालयापर्यंतच्या शेवटच्या सभासदापर्यंत पोचते आणि न्याय देते येथुन पुढे संघटनांना करेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भरती मजदुर संघाचे ग्रामीण विभाग – 2 चे राजेंद्र ढाले यांनी दिला यावेळी किरण माळी, सुरेश डवर, कुमार वनीरे, अविनाश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाला हुपरी उपविभागातील सर्व कंत्राटी बांधव उपस्थित होते कार्यक्रमानंतर अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली होती आभार अविनाश कांबळे यांनी मानले.
