करवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा, राष्ट्रवादीचा सभापती तर उपसभापती पद भाजपकडे

Share News

कोल्हापूर : 65 वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत करवीर पंचायत समितीवर महायुतीने पहिल्यांदाच झेंडा फडकवला आहे. आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने 24 पैकी तब्बल 16 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 7, भारतीय जनता पक्षाने 6 तर शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला होता. आज पार पडलेल्या निवडीवेळी सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताप्पा धोंडीराम पाटील तर उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या दिपाली संजय पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
साताप्पा पाटील हे परिते पंचायत समिती गणातून तर दिपाली पाटील या पाचगाव पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमदार अमल महाडिक यांनी महायुतीमध्ये समन्वयाची भूमिका घेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त जागांवर विजय संपादन केला होता. त्यामुळे करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापतीपदी भाजपच्या दिपाली पाटील यांना संधी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!