कोल्हापूर ग्रामीण विभाग-2 च्या अंतर्गत कागल उपविभागाच्या वतीने केंद्रीय नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार सोहळा संपन्न

Share News

कागल : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या महावितरण विभागातील ग्रामीण विभाग २ उपविभाग कागल यांच्या वतीने त्रैवार्षिक अधिवेशन पुणे येथे झालेल्या नूतन पदाधिकारी निवडीतील अमर लोहार आणि विजय कांबळे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार समारंभ मोठ्या उत्साहत पार पडला
पुणे येथे संघटनेच्या झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात अमर लोहार यांची केंद्रीय उपमहामंत्री पदी तर विजय कांबळे यांची केंद्रीय सचिव पदी निवड करण्यात आली होती…….
हा सत्कार समारंभ ग्रामीण विभाग २ चे अध्यक्ष आणी जिल्हा मीडिया प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली कागल उपविभातील पदाधिकारी यांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कामगार नेते कार्याध्यक्ष अनिल लांडगे आणी जिल्हा अध्यक्ष मिलिंद कुडतरकर हे होते.


संघटन मंत्री मधुकर माळी , सर्कल अध्यक्ष दिलीप गुरव , सर्कल उपाध्यक्ष किरण माळी , जिल्हा सचिव राहुल भालबर , जिल्हा कोषाध्यक्ष अमोल भास्कर , ग्रामीण विभाग २ अध्यक्ष राजेंद्र ढाले यांची प्रमुख उपस्थिती होती …..
विज कामगार महासंघाचे झोन सचिव प्रदीप वरपे आणि झोन सहसचिव मानसिंग गोधडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी सर्व प्रमुख वक्त्यांनी आपले विचार मांडले , यावेळी ५६५६ / २०१२ या कोर्ट केस मधील कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला
आमचा कागल उपविभागाने केलेला हा सत्कार म्हणजे आमच्या कामाची पोहोच पावती आहे , यामुळे आम्हाला पुनः काम करण्याची ऊर्जा मिळते असे मत अमर लोहार आणि विजय कांबळे यांनी व्यक्त केले
यावेळी कागल उपविभागातील सर्व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण विभाग २ चे अध्यक्ष राजेंद्र ढाले , कागल उपविभाग अध्यक्ष कुमार वनीरे , कार्याध्यक्ष अरुण मागदुम , उपाध्यक्ष ओंकार तवंदे , सचिव उदय भिसुरे , कोषाध्यक्ष अमोल पांढरे यांनी केले होते , तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत दळवी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!