
कोल्हापूर : रंगपंचमीच्या अनुषंगाने शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहिमेत ३७० वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे.कोल्हापूर शहरात पोलीस अंमलदार यांचे फिक्स पॉइंट ठिकाणी दि. ८ मार्च २०२६ रोजी सकळी ७ ते दुपारी ४ वाजताच्या कालावधीत पोलीस अधिकारी व पेट्रोलींग पथके नेमून यांना जरूर त्या सूचना देऊन ही मोहीम राबवण्यात आली होती.
उल्लंघन प्रकारामध्ये तिब्बल सीट वाहन चालविने , लायसन्स जवळ न बाळगणे , प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणे , वाहन चालवताना मोबाइलचा वापर , दारू पिऊन वाहन चालविणे , अस्पष्ट नंबर प्लेट, कर्कश हॉर्न वाजविणे इत्यादी समाविष्ट आहेत.यासर्व उल्लंघनांवरून ३ लाख १७ हजार १०० रुपये दंड आकारण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव , सहाय्यक पोलीस निरीक्षक मात्रे व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे.