
महिलांसाठी अत्याधुनिक जीमचे अनावरण, व्याख्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम
कागल : ८ मार्च रोजी “जागतिक महिला दिन” जगभरात उत्साहात साजरा करणेत येतो. महिला दिनाचे औचित्य साधुन दि.११ मार्च २०२६ रोजी बुधवारी सांय ५ वाजता कागल नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समिती कडुन शहरातील सर्व महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले.
लोकशाहिर आण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल, कागल येथे महिलांसाठी अत्याधूनिक जीमचे उदघाटन पोलीस उपनिरिक्षक सुप्रिया भिसे व लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप माने यांचे हस्ते करणेत आले. “सजग पालकत्व” या विषयांवर डॉ. निला जोशी यांनी आपले अमुल्य विचार मांडले महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्टॉल फनी गेम्स आयोजित करणेत आले.
नगरसेविका यांचे हस्ते कागल नगरपरिषद महिला सफाई कर्मचारी यांचा सत्कार स्मृतिचिन्ह व झाडांचे रोप देवून करणेत आला. सांस्कृतिक कार्यक्रमांत शहरातील उपस्थितीत व सहभागी झालेल्या महिलांना भेटवस्तू व विजेत्यांना महिलांना कुलर, मिक्सर, गृहपयोगी वस्तु इ. बक्षीसांचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमांस श्रीमंत सौ. शिवानी अखिलेशराजे घाटगे, माजी नगराध्यक्षा श्रीमती आशाकाकी माने, व मा. नगराध्यक्षा संगिता प्रकाश गाडेकर यांची प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर्पिता अर्चित राबाडी यांनी केले.

सदर कार्यक्रमांस लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप माने, महिला व बाल कल्याण सभापती सौ. सारिका स्वप्नील बारड, उपसभापती सौ. स्वरुपा सनी जकाते, तसेच सौ. सुवर्णा कुमार पिष्टे, सौ. पुनम शिवाजी मोरे, सौ. संगिता संतोष रजपुत, सौ. साधना विष्णू पाटील, सौ. सेहरनिदा नवाज मुश्रीफ, सौ. मेघा गजानन माने, श्रीमती रंजना दिलीप सणगर, सौ. सुमन चंद्रकांत गवळी, सौ. रझिया अस्लम मुजावर, श्रीमती मिना विलास लोटे सर्व महिला नगरसेविका, सर्व नुतन सदस्य, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशासकीय अधिकारी भारती चव्हाण, मयुरी जाधव, सभाकामकाज लिपीक उमाजी सोनुले सर्व नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.