
लिंगनूर : (ता. कागल) येथील विद्या मंदिर मराठी शाळेच्या पटांगणावर, छत्रपती शिवाजी तालीम व्हॉलीबॉल चषक २०२६ या राज्यस्तरीय डे-नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा शनिवार दि. १४ व रविवार दि. १५ मार्च रोजी होणार आहेत.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवार दि. १४ मार्च रोजी सायं. ४ वाजता होणार असून, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.सविता प्रताप माने यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती कागलचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध मान्यवर उपस्थिती राहणार असून
रविवार दि. १५ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता होणाऱ्या बक्षीस समारंभात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
बक्षीस समारंभाचे अध्यक्षस्थान क्रांती अग्रणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद अरुण लाड भूषविणार आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील नामांकित संघ सहभागी होणार असून क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक छत्रपती शिवाजी तालीम व्हॉलीबॉल क्लब, संयुक्त तोडकर गल्ली छ.शाहू साखर कामगार स्टाफ व सर्व ग्रामस्थ लिंगनूर दु॥ यांच्या वतीने करण्यात आले आहे.