करनूरात शांतता राखा,समझोता करा..पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर यांचे आवाहन..प्रकरणास पुर्णविराम..

Share News

करनूर (ता.कागल) : कागल तालुक्यातील करनूर येथे हिंदू – मुस्लिम गटात गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार जातीय दंगल झाली .दगड – विटा फेका-फेकीने कांही जण जखमी झाले .गाड्यांची मोडतोड करण्यात आली .शुक्रवारी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी व कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे हे सकाळी आकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आले .त्यांनी दोन्ही समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांना घेवुन शांतता – सलोखा ठेवण्याचे आवाहन केले .सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा मंडळी कडून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.त्या पार्श्वभूमीवर करनूर गावात मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.महा आरती नंतर मरिआई मंदीरातील बैठकीत पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या आवाहना नुसार वादावर पुर्णविराम.
मोबाईलवर अक्षेपार्हय पोस्ट व्हायरल केल्याच्या कारणावरून हिंदू मुस्लिम समाजात दोन गटात राडा झाला होता. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गावात ठाण मांडले व वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. कागल पोलीस ठाण्याच्या आवारातही मोठ्या प्रमाण कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गाव पातळीवर समझोता व्हावा , यासाठी पोलीस अधिकारी सुजित कुमार शिरसागर यांनी सकाळी आकरा वाजल्यापासून प्रयत्न सुरू केले . दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींना व ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली.घडलेल्या वादाचा विषय गाव पातळीवर एकोप्याने मिटावा , कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांतता राखावी यासाठी दोन्ही कडील प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पोलीस अधिकारी सुजित कुमार शिरसागर यांनी केले.
काही मंडळीनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास च्या निमित्ताने महा आरतीचे आयोजन केले .कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली .जलद कृती दलास पाचारण करण्यात आले .बाहेर गावच्या मंडळींनी येऊन महाआरतीत दंगा धोपा होऊ नये ,गालबोट लागू नये म्हणून करनूर गावात येणाऱ्या सर्व मार्गावर नाकाबंदी केली.पोलिसांनी सर्वाना तपासूनच गावात प्रवेश दिला .महाआरती संपली आणि जमलेल्या सर्व जमावास ग्रामदैवत मरिआई मंदिराच्या मंडपात एकत्रित घेऊन बैठक झाली. यावेळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार शिरसागर यांनी गावात शांतता राखण्याच्या दृष्टीने सर्वांनी दोन पावले मागे येऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यानुसार गेली दोन दिवस चाललेल्या या वादग्रस्त प्रकरणाला पूर्णविराम मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!