
कागल : कागल मधील पुढारी माळावर रंगलेल्या फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अक्षय शेळके साहेब प्रेमी हा संघ विजेता ठरला तर सांगाव स्पोर्ट्स मौजे सांगाव संघ उपविजेता ठरला
विजेत्या संघास कागल चे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रकाशरावजी गाडेकर यांच्या हस्ते चषक आणि रोख २५००० रु बक्षीस देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या संघास नगरसेवक अर्जुन नाईक आणि संतोष रजपूत यांच्या हस्ते चषक आणि रोख १५००० रु बक्षीस देऊन गौरविण्यात आले
शाहूनगर क्रिकेट क्लब यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला होता , उपांत्य पूर्व सामन्यात सांगाव स्पोर्ट्स विरुद्ध शाहूनगर क्रिकेट क्लब यांच्यात सामना रंगला होता , यामध्ये सांगाव संघाने विजय प्राप्त केला तर अक्षय शेळके साहेब प्रेमी संघाने सांगवडे या संघाला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता
स्पर्धेतील तिसरा क्रमांक सांगवडे स्पोर्ट्स यांनी तर चौथा क्रमांक शाहूनगर क्रिकेट क्लब यांनी पटकावला
या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अजय गोंधळी , उत्कृष्ट स्पर्धावीर हर्ष पाटील , उत्कृष्ट गोलंदाज विनोद , फायनल सामनावीर सागर मकवाना ठरला
अंतिम सामन्यात सांगाव स्पोर्ट्स संघाने अक्षय शेळके साहेब प्रेमी संघासमोर विजयासाठी निर्धारित ७ षटकात ७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते ते ५ षटकात पूर्ण करत विजयावर शिक्कामोर्तब केले यावेळी विजयी संघाने एकच जल्लोष केला …….