कागल पोलिसांच्या पाठपुराव्याला यश ; चोरीला गेलेले ६२ मोबाईल हँडसेट मूळ मालकांना दिले परत ; कागल पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी..

Share News

कागल (ता.कागल): कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव , नवरात्रोत्सव श्री गहिनीनाथ गैबीपीर उरूस कागल या सण उत्सव काळातील मिरवणुकीतील तसेच आठवडी बाजार अशा ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन चोरीला गेलेले तब्बल ६२ मोबाईल हस्तगत करून एकूण सुमारे ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल देण्यात आला.काल दि १९ मार्च रोजी ३० मोबाईल मूळ मालकाला परत करण्यात आले.या आदी ३२ मोबाईल मूळ मालकाला परत देण्यात आले होते.
कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून
विविध कंपन्यांचे अँनरोईड मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना घडल्या होत्या हे मोबाईल गहाळ झाल्यावर कागल पोलिसांनी त्यांच्या नोंदी घेतल्या होत्या यानंतर कागल पोलिस ठाण्याकडील पोलीस जाफर हिम्मत कुरणे यांनी सायबर पोलिसांच्या मदतीने CEIR या पोर्टलद्वारे मोबाईलचे IMER नंबर ट्रेसिंग वरती ठेऊन त्यावर सातत्याने पाठपुरावा केला महाराष्टातील कोल्हापूर तसेच कोल्हापुरातील विविध भागात आणि कर्नाटक , आसाम, उत्तर प्रदेश राज्यातील व्यक्ती हे मोबाईल वापरत असल्याचे आढळून आले त्या व्यक्तींशी संपर्क साधून ते हस्तगत करून मुळ मालकाच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता , अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बी धीरजकुमार , उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर करवीर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलिस जाफर हिम्मत कुरणे, चिंतामणी कांबळे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!