कोल्हापुरात मिनी प्रदर्शन; मराठा विकास संस्थेकडून आयोजन

Share News

कोल्हापूर : स्थानिक उद्योजक, गृहउद्योग व लघु व्यवसायिकांना आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मराठा विकास संस्था यांच्या वतीने वन डे मिनी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी
जुना बुधवार पेठ तालीम हॉल, पंचगंगा नदीजवळ येथे सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी स्टॉलची सुविधा केवळ २०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली असून
या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे या प्रदर्शनातील स्टॉल बाबत इच्छुकांनी प्रताप पाटील – 8975235700 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
मराठा विकास संस्था यांच्यावतीने समाजातील लघू उद्योजक , व्यावसायिक तसेच व्यापारी याना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे आणि मराठा व्यावसायिकांचे हात बळकट करण्यासाठी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!