कागल पंचतारांकितमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक मुलगा जागीच ठार..

Share News

गोकुळ शिरगाव : कागल पंचतारांकित एम आय डी सी मध्ये मेटा कास्ट कंपनीच्या समोर टेम्पोची दुचाकीला जोराची धडक दिली त्यात पाठीमागे बसलेला मुलगा त्याचा जागीच मृत्यू झाला . अथर्व प्रकाश कानडे (वय ११ वर्ष, रा. बेळगुंद्री, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. तर दुचाकी चालवणारे संदीप शेटे( व.व ३९ रा.साजणी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर)व कुंजल प्रकाश कानडे ( व.व.१४ रा.बेळगुंद्री ता.गडहिंग्लज जि. कोल्हापूर ) हे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची नोंद श्रीधर शेटे यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीप शेटे हे त्यांच्या युनिकॉर्न मोटर सायकल नं MH 09 DH-6583 येत असताना आयशर टेम्पो नं MH09-CA-1206 भरधाव वेगाने येऊन संदिप विश्वनाथ शेटे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये मागे बसलेल्या अथर्व याचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप शेटे व कुंजल कानडे हे जखमी झाले आहेत. आयशर चालक अपघातानंतर वाहन सोडून पळून गेला असून पुढील अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!