जनता अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. कागल; संस्थेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न..

Share News

कागल : कागल येथील जयसिंगराव पार्क परिसरात “जनता अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. कागल” या संस्थेचा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या नव्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना , शेतकरी व व्यापाऱ्यांना आर्थिक सुविधा, बचत व कर्ज सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

या जनता अर्बन संस्थेचे उद्घाटन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना , शेतकरी व व्यापाऱ्यांना आर्थिक बळ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमास शाहू ग्रुप चे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने , कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ सविता प्रताप माने यांनी सदिच्छा भेट दिली.. माननीय शिवाजी खोत यांचे या क्षेत्रातील हे पदार्पण जरी नविन असले तरी हे पदार्पण एक नाविन्यपूर्ण आणि यशस्वी राहील याचा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून चंद्रकांत गवळी (अध्यक्ष श्रीनाथ ग्रुप) नगरसेवक अमित पिष्टे, अर्जुन नाईक, साधना पाटील, रमेश तोडकर (माजी सभापती) , प्राचार्य डॉ. एन. एल. कदम (डी आर माने कॉलेज), मोहन तोरगलकर, श्रीमती सविता ढवण, जनता अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन मा. शिवाजी खोत, व्हा. चेअरमन प्रा. डॉ. लखन भोगम, गजानन खोत, प्रदीप शिंत्रे, संतोष ढवण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!