हुपरी येथील मिलिंद हौ. सोसायटीच्या जागेतील अतिक्रमण हटवण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन

Share News

हुपरी (ता.हातकणंगले ) : हुपरी येथील मिलिंद हौ.सोसायटीच्या हद्दीतील जागेवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण त्वरित हटवावे या मागणीसाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हातकणंगले तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील माळभागावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सभोवतालची जागा ही मिलिंद हौ. सोसायटीच्या मालकीची आहे. पुतळा परिसरात भोवताली पानवाले ,चायनीज सेंटर, चिकन गाडे, चिकन ६५ च्या गाड्या भाजी विक्रेते यांनी मोठया प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे पुतळा परिसरात राहदरीस अडथळा निर्माण होत आहे. तिथे बुधवारी आठवडी बाजार भरतो.लोकांना गाडी लावण्यास सुद्धा जागा मिळत नाही.
हुपरी येथील माळभागावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी विश्वहिंदू परिषद आणी बजरंगदल यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत पुतळ्यापासून डावीकडे तीस फुटातील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला होता.दरम्यान याबैठकीत मूळ जागा मालक असलेल्या मिलींद हौ. सो.किंवा पदाधिकाऱ्यांना विचारता न घेता निर्णय घेतला होता. पण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील सर्व अतिक्रमण काढून परिसर मोकळा करावा अशी मागणी मिलींद हौ. सोसायटीने केली आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यापुढे सोसायटीला विचारल्या शिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. तसेच पुतळा परिसरातील अतिक्रमणे हटवली नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा सोसायटीचे चेअरमन किरण हुपरीकर , व्हा.चेअरमन भरत काशिनाथ माणकापुरे, सोसायटीचे सेक्रेटरी संजय शेंडे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!