आई-वडिल व जेष्ठ नागरीक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असणाऱ्या कायद्याची गावपातळीवर अंमलबजावणी करावी; करवीर तालुका शिवसेना (उबाठा)

Share News

मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने प्रांत. मौसमी चौगुले, उपविभागीय अधिकारी, करवीर यांना देण्यात आले

करवीर : आई-वडिल व जेष्ठनागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असणाऱ्या कायदयाची माहिती गाव पातळीवर नसल्याने एखादया ठिकाणी मुलगा, सुन त्रास देत असतील तर तो जेष्ठनागरीक किंवा आई-वडिल स्थानिक पोलिस स्टेशन आधार घेतात पण तिथे कोणताही न्याय निवाडा होत नाही. त्यांना समजावून परत पाठविले जाते. गावागावात जेष्ठ नागरिक अशी अनेक पिडीत हे स्थानिक, पोलिस स्टेशन, तंटामुक्त समिती किंवा गावातील एखादया पुढारी यांच्याकडे तक्रार करतात. पण तिथे काय कायमचे मिटत नसल्याने ते वयस्कर दापंत्य निराश होते. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार विनामुल्य होत आहे. हे गावातील गावकामगार तलाठी मार्फत प्रत्येक गावातील तलाठी कार्यालयात फलक लावुन जेष्ठाच्याही स्वरक्षणाचा कायदा आहे. हे गावपातळीवर ग्रामपंचायत असेल किंवा तलाठी कार्यालय येथे फलक किंवा जनजागृतीसाठी कार्यक्रम होणे गरजेचे आहे. तरी आपण गावपातळीवर योग्य ते नियोजन करावे. जेणे करून जेष्ठनागरीक व आई वडिल यांना सरकारी कायद्याचा योग्य तो उपयोग होईल अशी करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे..
करवीर तालुका प्रमुख राजू यादव बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ नागरिक आई-वडिलांना या कायद्याविषयी कोणतीही कल्पना नाही, त्यामुळे तलाठी कार्यालय असेल तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून गावागावामध्ये या कायद्याविषयी जनजागृती करावी..
या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने प्रांत मा.मौसमी चौगुले, उपविभागीय अधिकारीसो, करवीर यांना देण्यात आले..
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक गावातील तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयांना सांगू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले..
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना राजू सांगावकर, वाहतूक सेना हर्षल पाटील,दिनेश परमार, युवा सेना योगेश लोहार, दिपक गौड, वाहतूक सेना दत्ता फराकटे, संतोष चौगुले, सुनील पारपणी , अजित रोटे, बाबुराव पाटील, रामराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!