ऑनलाईन फसवणूक झाल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केल्यास फसवणुकीची अधिकाधिक रक्कम परत मिळू शकते, हे कुपवाड औद्योगिक पोलिसांनी दाखवून दिले आहे. अशाच एका फसवणुकीत १७ लाख इतकी मोठी रक्कम परत मिळविण्यात यश मिळवले आहे.
जादा परताव्याच्या अमिषाने परप्रांतीय टोळक्याने बामणोलीतील वीरेंद्र मल्लिकार्जुन पाटील यांची १७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे करीत आहेत.
कुपवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन कॉल आला. समोरुन बोलणान्या इसमाने शेअर्स इन्वेस्टमेंट, फॉरक्स ट्रेंडींगची माहिती देवून मनी कंट्रोल एप डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादीने त्यांचे सांगणेवरुन मनी कंट्रोल एप त्यांचे मोबाईलवर डाऊनलोड केले. त्यानंतर अनोळखी इसमांनी फिर्यादीशी पुन्हा संपर्क साधुन त्याची ओळख ओमप्रकाश मिश्रा च अमीतकुमार अशी सांगितली. त्यांनी फिर्यादी यांना जादा परताव्याचे आमीष दाखवून रक्कम गुंतवण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी सुरुवातीस पाच लाख रुपये त्यांनी दिलेल्या यूपीआय आयडी व बँक खात्यावर ट्रान्सफर केली. आरोपींनी फिर्यादी यांना दीड लाख रुपये परताव्याची रक्क्म त्यांचे बँक खात्यावर ट्रान्सफर केली. त्यामुळे फिर्यादीला त्यांचेवर विश्वास बसलेने फिर्यादीने १४ लाख ९१ हजार रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खाते व युपीआय आयडीवर ट्रान्सफर केली. परंतु आरोपींनी कबुल केलेप्रमाणे त्याना परतावा न मिळाल्याने फिर्यादी यांनी चौकशी केली असता त्यांची फसवणुक झाल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यानंतर फिर्यादीने कुपवाड आद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये आरोपींचे मोबाईल नंबर वरुन सायबर पोलीस ठाणेकडुन वेळोवेळी लोकेशनची माहिती घेण्यात येत होती. आरोपींचे लोकेशन इंदौर मध्यप्रदेश येथे असल्याची खात्री झाल्यानंतर तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव व कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक गाडवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतिश माने, नामदेव कमलाकर, अरूणा यादव यांचे पथक इंदौर मध्य प्रदेश येथे रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक गाडवे व पथकाने इंदौर मध्य प्रदेश येथील स्थानीक पोलीस व सायबर पोलीस यांचे मदतीने शिताफीने यातील आरोपींचा ठावठिकाणा शोधुन आरोपी १) ओमप्रकाश मीश्रा ऊर्फ जितेंद्र कल्याण बंजारा वय २५ रा. क्रशी मंडी रोड, टंकीपुरा ता. देगाना जि. नागौर राजस्थान सध्या रा. इंदौर २) अमीतकुमार ऊर्फ गोपाल नवल चौहान वय २० वर्षे रा. तक्षक मंदीरजवळ, दसनावल ता. गोगावा जि. खरगॉज मध्यप्रदेश सध्या रा. इंदौर व ३) दीक्षा देवीसिंग जाडोन वय २६ वर्षे रा.घर नं. ६७, गल्ली नं. ५, नंदानगर पाटणीपुरा इंदौर मध्यप्रदेश यांना गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. सदर आरोपींकडे सखोल च कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपींनी फिर्यादीची फसवणूक केलेले रक्कमेपैकी 17 लाख रुपये परत केली आहे. सायबर गुन्हयामधील आरोपींचा शोध घेवुन गुन्हयातील फसवणुक रक्कम मोठ्या प्रमाणात हस्तगत करणेचे अशक्य व अविश्वसनीय काम सांगली जिल्हा पोलीस दलाने केले आहे.
ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींना प्रतिसाद देऊ नका – पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली
सदर गुन्हयतील जप्त करण्यात आलेली रोख रक्कम 17 लाख रुपये फिर्यादीस पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचे हस्ते फिर्यादी यांना परत केली आहे. फिर्यादी यांनी त्यांची फसवणुक रक्कम गुन्हा दाखल झाल्यापासुन एक महिन्याचे कालवधीत हस्तगत केलेने पोलीस दलाचे आभार मानुन कौतुक केले. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी देखील गुन्हे तपासात सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे कौतुक करुन ऑनलाईन फसवणुकीपासुन दूर राहण्याचा तसेच कोणत्याही आमीषाला व प्रलोभनाला बळी पडून पैसे गुंतविण्यापेक्षा योग्य सल्ला व मार्गदर्शन घेवुन रक्कम गुंतवु नये. तसेच गुंतवणी संदर्भात येणारे व जादा परताव्याचे आमीष दाखविणारे फोनला प्रतिसाद देवू नये. असे जनतेला आवाहन केले आहे.