कुपवाड – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे कुपवाड शहरातील सोसायटी चौकात गुलाल लावीत, फटाक्यांची आतिषबाजीत पेढे – साखर वाटप करत जल्लोष करण्यात आला.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ, उपाध्यक्ष बिरु असकी, रमेश जाधव, शिवसेना नेते महादेव मगदूम, सुरेश साखळकर, भालचंद्र (रुपेश) मोकाशी, राजेंद्र पवार, माजी उपमहापौर मोहन जाधव, प्रकाश मुळे, भाजप नेते रवींद्र सदामते, सुभाष गडदे, विलास जगताप, राजू जाधव, तुकाराम जाधव राष्ट्रवादी युवा नेते विजयदादा खोत, आशुतोष धोतरे, तानाजी गडदे तसेच बाबासाहेब डूबुले, दीपक कदम, नामदेव पाटील, लक्ष्मण पाटील, नारायण पवार, अतुल निकम, काशिनाथ संपन्ना व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.