सांगली – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. रामदास आठवले प्रणित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मराठा आघाडीची महत्त्वाची बैठक सांगली येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जगन्नाथ दादा ठोकळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष श्वेत विवेकरावजी कांबळे यांची प्रमुख उपस्थित होते.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी सांगली शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते किशोर गजानन मुळीक यांची सांगली शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मराठा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेतभैय्या कांबळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील सर्वच समाजाच्या जनतेस न्याय हक्क मिळवून देण्याचं कार्य ना.रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे. सर्वच समाजाचे बंधू-भगिनी रिपब्लिकन पक्षांमध्ये कार्य करण्यास उत्सुक आहेत,त्यांचे रिपब्लिकन पक्षांमध्ये स्वागत आहे. रिपब्लिकन संकल्पना ही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून घेतलेली असून शिव,फुले,शाहू,आंबेडकर, साठे यांच्या विचारधारेवर आधारलेल्या रिपब्लिकन पक्षाची ताकद दिवसे गणित वाढताना दिसत आहे आणि ही ताकद महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आम्ही आजमावणार असून महाराष्ट्रामध्ये सर्व जाती-धर्माचे रिपब्लिकन पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही उभे करणार आहोत.मराठा आघाडीच्या सांगली शहराध्यक्षपदी किशोर मुळीक यांची निवड झाल्याबद्दल त्यांना त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सांगली जिल्हा अद्यक्ष सोशल मीडिया व आय.टी.सेल चे सांगली जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे सांगली शहर उपाध्यक्ष अजय उबाळे,सचिन ऐवळे,युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते दिगंबर शिंदे यांचेसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.