
महागाव (ता. गडहिंग्लज) : संत गजानन महाराज आयुर्वेद मेडिकल कॉलेजचा दिक्षांत समारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आले.
या सोहळ्यात बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेद क्षेत्रात सकारात्मक योगदान देण्याचे आवाहन केले. पारंपरिक आयुर्वेद ज्ञानाचा आधुनिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी वापर करत समाजसेवेचे भान ठेवण्याचे मार्गदर्शन त्यांनी दिले.
कार्यक्रमाला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आसगावकर, डॉ. मिलिंद निकुंभ, आण्णासाहेब चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखाताई चव्हाण, डॉ. शशिकांत पाटील-चुयेकर, प्राचार्या मंगल मोरबाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या दिक्षांत समारंभाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.