
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात शहरात दिनांक दि. १७/१०/२०२५ ते दि. २३/१०/२०२५ रोजी अखेर मोठया प्रमाणान दिपावली सण साजरा होणार आहे. दिपावली पूर्व खरेदी करीता दिनांक १२.१०.२०२५ रोजी पासून नागरीकांची गर्दीच्या अनुषंगाने महाद्वार रोडवरील दुकांनामध्ये खरेदी – विक्री करीता लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच दिपावलीच्या सलग सुट्या असलेने श्री अंबाबाई देवीचे दर्शनाकरीता महाराष्ट्र राज्यातून व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक आप-आपल्या मोटार वाहनांनी येत असतात. त्या परिसरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून नागरिकांची व भाविकांना रस्ता सुरक्षा प्रस्थापित होणे आवश्यक असलेने मा. पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांनी दिपावली उत्सव कालावधीत चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
(पोलीस वाहन, फायर बिग्रेड व अॅम्ब्युलन्स यांना वगळून)
वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग –
१. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी पर्यंत चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
(पोलीस वाहन, फायर बिग्रेड व अॅम्ब्युलन्स यांना वगळून)
२. भाऊसिंगजी रोड वरुन गुजरी गल्ली येथे जाणेस सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
महाद्वार रोडला मिळणारे खालील रस्ते डावीकडे/उजवीकडे वळणेस प्रवेश बंद करणेत येत आहेत.
१. वांगी बोळ मधुन येवून डावे बाजूस वळणेस प्रवेश बंद
२. ताराबाई रोडने येऊन महालक्ष्मी चौक येथुन डावे बाजुस वळणेस प्रवेश बंद
३. बाबू जमाल रोडकडुन येवुन डावे बाजुस वळणेस प्रवेश बंद
४. कसबा गेट पोलीस चौकीकहुन येवुन डावे बाजूस वळणेस प्रवेश बंद
५. दत्त गल्लीमधुन येवुन डावे बाजुस वळणेस प्रवेश बंद
वळविणेत आलेले मार्ग –
१. सरस्वती टॉकीज चौकातुन ताराबाई रोडने महाब्दार रोडकडे येणारी वाहतुक पुढे न जाता बाबू जमाल दर्गा किंवा अर्ध छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गाने जाईल.
वरील सर्व मार्ग शहरात दि. १२/१०/२०२५ ते दि. २३/१०/२०२५ रोजी पर्यंत वरील प्रमाणे प्रवेश बंद व मार्ग वळविणेत आलेले आहेत.असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.