
सांगली : आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण, बाजारपेठ व्यवस्थापन, स्वच्छता व सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सांगली महानगरपालिकेत आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष आढावा बैठक पार पडली. बैठकीत व्यापारी, विक्रेते, लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाच्या सूचनांच्या आधारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे, वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, तसेच महापालिकेचे अधिकारी, व्यापारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
१. विक्रेत्यांसाठी नियमावली:
दत्त मारुती चौक ते बालाजी चौक या रस्त्यावर निश्चित पट्ट्यातच विक्रीस परवानगी दिली जाणार आहे. परवानगीशिवाय विक्री केल्यास साहित्य जप्त केले जाईल.
लक्ष्मीपूजन साहित्य, रांगोळी, पणती आदी वस्तूंसाठी नवसंदेश बोळ, तरुण भारत कॉर्नर ते आनंद टॉकीज चौक आणि कृष्णामाई रोड परिसर निश्चित.
२. वाहतूक आणि पार्किंग:
नवसंदेश बोळ ते तानाजी चौक आणि भारती विद्यापीठ ते मदनभाऊ व्यापारी संकुलपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा ठेवला जाणार.
पार्किंगसाठी जयश्री टॉकीज मागे, जनावर बाजार, वैरण अड्डा आणि राजवाडा परिसरात जागा निश्चित.
नागरिकांना चारचाकी वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन.
३. व्यापारी व स्वच्छतेसाठी सूचना:
दुकानदारांनी लोखंडी पायरी २ फूटांच्या मर्यादेतच ठेवावी.
दुकानदार व कर्मचारी यांनी आपली वाहने निश्चित पार्किंगमध्ये ठेवावीत.
कचरा घंटागाडी किंवा कंटेनरमध्येच टाकण्याचे निर्देश.
४. आपत्कालीन सुविधा:
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधावा.
5. फटाके स्टॉल करिता :
कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथ नगर, राजमती भवन शेजारी, विश्राम बाग, सांगली