जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण जाहीर, हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत

Share News

सांगली : जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच महिला (एससी, एसटी, ओबीसी व सर्वसाधारण) यांच्यासाठी गटनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.

ही सोडत जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. या वेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अजय पवार, तहसीलदार लीना खरात आदी अधिकारी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त कार्यक्रमानुसार ही सोडत पार पडली.

गटनिहाय आरक्षणाचे स्वरूप पुढीलप्रमाणे:

महिला सर्वसाधारण: 46 येलूर, 48 वाकुर्डे बुद्रुक, 5 जाडरबोबलाद, 53 आरग, 20 वांगी, 14 नागनाथनगर नागेवाडी, 12 डफळापूर, 47 पणुंब्रे तर्फे वारूण, 7 संख, 16 करंजे, 3 निंबवडे, 38 कासेगाव, 39 वाटेगाव, 15 लेंगरे, 45 बागणी, 30 देशिंग, 33 दुधोंडी, 52 एरंडोली, 36 रेठरे हरणाक्ष.

महिला मागासवर्ग प्रवर्ग: 21 देवराष्ट्रे, 40 पेठ, 13 बिळूर, 37 बोरगाव, 19 कडेपूर, 57 बुधगाव, 59 कवठेपिरान, 18 तडसर.

महिला अनुसूचित जाती प्रवर्ग: 61 म्हैसाळ (एस), 55 मालगाव, 56 कवलापूर, 54 बेडग.

सर्वसाधारण: 10 बनाळी, 58 कसबे डिग्रज, 4 खरसुंडी, 22 मांजर्डे, 50 मांगले, 26 चिंचणी, 2 करगणी, 32 कुंडल, 51 भोसे, 35 भिलवडी, 25 येळावी, 44 बावची, 8 दरिबडची, 17 भाळवणी, 42 कामेरी, 49 कोकरूड, 24 विसापूर, 43 चिकुर्डे, 27 मणेराजुरी.

मागासवर्ग प्रवर्ग: 11 शेगाव, 1 दिघंची, 9 मुचंडी, 29 कुची, 28 ढालगाव, 41 वाळवा, 34 अंकलखोप, 60 समडोळी.

अनुसूचित जाती प्रवर्ग: 31 रांजणी, 6 उमदी, 23 सावळज.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या 122 निर्वाचक गणांसाठी संबंधित तहसीलदार कार्यालयांतही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.

हरकती व सूचना स्वीकारण्याची मुदत:
जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी झालेल्या या प्रारूप आरक्षण सोडतीवर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारण्यात येतील. इच्छुकांनी आपली लेखी हरकती संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी, सांगली कार्यालय येथे सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!